*राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या वर्षपूर्ती निमित्त*
*कुष्ठांतेय सल्ला, सेवा व सक्षमीकरण केंद्राचा शुभारंभ सोहळा संपन्न
*सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था व अवॉर्ड संस्थेचा संयुक्त उपक्रम*
दिनचर्या न्युज
नागभीड:
सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था आणि अवॉर्ड संस्था नागभीड जि. चंद्रपूर यांच्या संयुक्त उपक्रम *कुष्ठांतेय सल्ला, सेवा व सक्षमीकरण केंद्राचा शुभारंभ सोहळा* आज दिनांक 2 ऑक्टोंबर या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या वर्षपूर्ती निमित्त संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उदघाटक म्हणून संजय गजपुरे, सदस्य जि.प. चंद्रपूर तथा भाजपा महामंत्री हे होते, विशेष प्रमुख अतिथी म्हणून नागभीड नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष गणेश तर्वेकर हे होते. मार्गदर्शक म्हणून अलर्ट इंडिया मुंबईचे, कुष्ठरोग कार्यक्रम प्रमुख, आशुतोष प्रभाकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अवॉर्ड संस्थेच्या अध्यक्ष शम्मा शेख, सचिव गुणवंत वैद्य आणि कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत शेंडे हे होते. यावेळी मार्गदर्शन करतांना अलर्ट इंडिया मुंबई व अवॉर्ड संस्था नागभीड वतीने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षांपासून कुष्ठरोग दूरीकरनाचे कार्य सुरू आहे. सन 2016 पासून *मानवाधिकाकाराधिष्ठित कुष्टरोग दुरीकरण कृती कार्यक्रम* हा प्रकल्प सुरू असून प्रकल्पाचे कार्यवाहीतून कुष्ठरुग्ण सक्षमीकरणाची मोहीम/ चळवळ उदयास आली आणि कुष्ठरुग्णाची सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था स्थापन व नोंदणीकृत झाली असल्याचे प्रतिपादन आशुतोष प्रभावळकर यांनी यावेळी केले.
कुष्ठांतेयांची ही संस्था कुष्ठरोग क्षेत्रात कार्यात मौलिक योगदान देऊन नागभीड पासुन राष्ट्रीय स्तरापर्यंत नावारूपाला येईल असा आशावाद संजय गजपुरे यांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केला व संपुर्ण भारतात कुष्ठांतेय रुग्णांकडुन कुष्ठांतेयांसाठीच्या मार्गदर्शन व उपचारासाठी ही पहिलीच संस्था असल्याचा उल्लेख करीत आत्मनिर्भरतेकडे वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच अशा रुग्णांकडे कुत्सित व हेटाळणीच्या नजरेने समाजाने बघु नये असे प्रतिपादन केले. यावेळी आशुतोष प्रभावळकर यांनी स्वहस्ते देणगीचा धनादेश सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत शेंडे यांना सुपूर्द केला. इतर अतिथींचे यावेळी समयोचीत भाषने झालेत .
कुष्ठांतेय सल्ला, सेवा व सक्षमीकरण केंद्र हे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील कुष्ठांतेयासाठी व कुष्ठभयमुक्त समाज निर्मितीसाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे. हे केंद्र अवॉर्ड नागभीड येथे दर शनिवार ला सकाळी 10 ते 2 वाजता पर्यंत सुरु राहणार आहे. कुष्ठांतेय व त्यांचे कुटुंबातील व्यक्तींनी या केंद्रातील सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावे असे आवाहन कुष्ठांतेय संस्थेचे अध्यक्ष उमाकांत शेंडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे संचालन संदीप माटे यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद बारशिंगे यांनी केले, यावेळी सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे सभासद, अवॉर्ड चे सभासद यांची उपस्थिती होती.
दिनचर्या न्युज