3 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉक डाऊन सध्या स्थगित करण्यात आले आहे.




3 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉक डाऊन सध्या स्थगित करण्यात आले आहे.

दिनचर्या न्युज

29 ऑगस्ट ला मा पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबर पासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय
लॉक डाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉक डाऊनच्या परवानगी साठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या 3 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.