चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 3903 बाधित
उपचार घेत असलेले 2007 बाधित
आतापर्यंत बरे झालेले 1850 बाधित
24 तासात नव्याने 262 पॉझिटिव्ह; पाच बाधितांचा मृत्यू
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर: जिल्ह्यात 24 तासात नव्याने 262 पॉझिटिव्ह आढळले असून एकूण बाधितांची संख्या 3 हजार 903 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 850 बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 2007 बाधितांवर उपचार सुरू आहे.
गेल्या 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 46 झाली असून चंद्रपूर 42, तेलंगाना एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे. 24 तासात मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमुर तालुक्यातील शिवरा येथील 40 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तसेच, दुसरा मृत्यु 70 वर्षीय विकास नगर वरोरा येथील पुरुष बाधिताचा आहे. 1 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 5 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.
तिसरा मृत्यू हा 65 वर्षीय तुकुम चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा आहे. 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया आजार होता. 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर,चवथा मृत्यु केळझर तालुका मुल येथील 86 वर्षीय पुरूष बाधिताचा आहे. या बाधिताला 26 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने आज 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तर,पाचवा मृत्यु हा 90 वर्षीय दादमहल चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 5 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. आज 6 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातीस 143, सावली तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील 10, गोंडपिपरी तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील 17, मूल तालुक्यातील 28, राजुरा तालुक्यातील 4, वरोरा तालुक्यातील 7, कोरपना तालुक्यातील 2, भद्रावती तालुक्यातील 17, पोंभूर्णा तालुक्यातील 9, नागभीड तालुक्यातील 9, सिंदेवाही तालुक्यातील 3, चिमूर तालुक्यातील 7, जिवती तालुक्यातील एक तसेच इतर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एक, ठाणे मुंबई येथील एक तर चामोर्शी तालुक्यातून एक असे एकूण 262 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील वडगाव, बालाजी वार्ड, महेश नगर, गुरुद्वारा परिसर, देवई-गोविंदपुर तुकुम, महाकाली वार्ड, बाजार वार्ड, कृष्णा टॉवर, शिवनगर तुकूम, जल नगर वार्ड , मित्र नगर,रामनगर, भानापेठ वार्ड, महाकाली वार्ड, घुटकाळा वार्ड, गजानन बाबा नगर, दाद महल वार्ड, सावरकर नगर, भिवापुर वॉर्ड, छोटा बाजार परिसर, हनुमान नगर तुकुम, दाताळा रोड परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, अंचलेश्वर गेट परिसर, नगीनाबाग, वार्ड नंबर 1 दुर्गापुर, गंज वार्ड, सिस्टर कॉलनी परिसर, बालाजी वार्ड,बिनबा वार्ड, बाबुपेठ या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.
तालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:
भद्रावती तालुक्यातील संताजी नगर, गणपती वार्ड गौराळा, भोज वार्ड, पाटाळा, माजरी कॉलरी परिसर, घोडपेठ, आंबेडकर वार्ड, शास्त्रीनगर, एकता नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील सराफा लाईन, जिजामाता वार्ड, बोर्डा भागातून बाधित पुढे आले आहे.
नागभीड तालुक्यातील जनकापूर, भिकेश्वर, मिंडाळा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातून हनुमान नगर, लाडज, इंजिनिअरिंग कॉलनी परिसर, बोरगाव, बेटाळा, तोरगाव, खरकाडा, शेष नगर, हनुमान नगर, गांधीनगर भागातून बाधित पुढे आले आहे.
बल्लारपूर येथील रेल्वे वार्ड, बालाजी वार्ड, श्रीराम वार्ड, गोरक्षण वार्ड, आंबेडकर वार्ड, सरदार पटेल वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मूल तालुक्यातील दिघोरी, मारोडा, राजगड, केळझर, चितेगांव या गावातून बाधित पुढे आले आहे.पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द, बोर्डा भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक, पोलिस क्वॉर्टर परिसर, नेरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
000000