चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५८०,
३४९ झाले बरे ; २३० वर उपचार सुरू
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि २ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 58O वर पोहोचली आहे काल जिल्ह्यामध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 349 बाधित बरे झाले आहेत तर 23O बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरातील ५ पॉझिटिव्हचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे.यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हा व्यक्ती आहे.
अंचलेश्वर गेट परिसरातील वीस वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. करीमनगर येथून प्रवास केल्याची त्याची नोंद आहे.
चंद्रपूर शहरातील दुर्गापुर वार्ड बस स्टॉप जवळील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हे चाळीस वर्षीय महिला बाधित आढळली आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एका 58 वर्षीय महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
चंद्रपूर येथीलच सिस्टर कॉलनी परिसरातील 58 वर्षीय अन्य जिल्ह्यातून प्रवास करून आलेली 58 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील 12 पॉझिटिव्ह पुढे आले आहे. यातील पाच जण हे यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाच्या थेट संपर्कातील आहेत. तर अन्य ६ जण अन्य जिल्ह्यातून प्रवास करून नागभीड तालुक्यात पोहोचल्याची नोंद आहे.
कोरपना तालुक्यातील दोन रुग्णांची नोंद झाली आहे. शास्त्रीनगर आवारपूर येथील रुग्ण आणि वार्ड नंबर 6 कोरपणा येथील रुग्णाचा समावेश आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन पॉझिटिव्ह आजच्या यादीत पुढे आले आहे. यापैकी एक ब्रह्मपुरी शहर तर दुसरा रानबोथली येथील संपर्कातील पॉझिटिव्ह आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील संपर्कातील आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह ठरला आहे. तर
भद्रावती तालुक्यातील ३ जण पॉझिटिव्ह ठरले आहेत. यापैकी २ जण पुणे येथून प्रवास करून आल्याची त्यांची नोंद आहे.
चिमूर तालुक्यातील पीपराडा पळसगाव येथील संपर्कातील एक आणखी पॉझिटिव्ह पुढे आला आहे.
अशाप्रकारे सायंकाळी आठ वाजेपर्यंत रुग्णांची संख्या 58O झाली आहे.
दिनचर्या न्युज