पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा व वंदनिय योजनेचा शुभारंभ




पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा व वंदनिय योजनेचा शुभारंभ

आशा वर्कर यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव
चंद्रपूर 
दिनचर्या न्युज -
महाराष्ट्रातील  आशा वर्करांना कोरोना 19 या काळात अनेक समस्यांना समोरे जावे लागले. तरीपण आशा वर्कर खंबीरपणे आपल्या कार्याशी तत्पर राहुन घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबाचे सर्वे करुन कोरोनाणासी दोन हात लढण्याची प्रेरणा देण्यात यशस्वी ठरल्या. चंद्रपूर जिल्हयातील ग्रामिण भागातील काम करणा-या आशा वर्कर नाही तर, आशाताई या नावाने संबोधल्या जाईल. भविष्यात आशा वर्कर या नावाने इतिहासातही नोंद केल्याचे पहावयास मिळेल असे कार्य आशा वर्करच्या हातून 16 व्या शतकातील महिलांचे काम आज या महिलांमध्ये दिसुन आले. त्यांचा गौरव म्हहणू आज रक्षाबंधनाच्या दिवशी जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आशा भगिनीकडुन राखी बांधुन घेत त्यांना 1100 रु. चा चेक आणि 400 रु. सहकिट देवून सन्मान केला. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेटृटीवार यांच्या हस्ते अत्यंत भावस्पर्शी वातावरणात हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम चंद्रपूर येथील नियोजन भवनातील जनसंपर्क कार्यालयात पार पडला. 
या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठाण चंद्रपूर यांच्या सौजन्याने, पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा व पालकमंत्री वंदनिय योजनाचा शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री विजय वडेटृटीवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मार्गदर्शनात बोलतांना दिवसंदिवस वाढत चाललेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयातील ग्रामिण भागात अनेक ठिकाणी बाधीतांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या खबरदारीच्या दृष्टीने आपल्या परिवाराची पर्वा न बाळगता रात्रंदिवस सेवा देवून अपु-या मानधनातही राष्ट्रीय  सेवा देण्याचे काम या आशा ताईंनी केले आहे. यांचे आम्हाला अभिमान आहे अशा शब्दात त्यांचा गौरव केला. 
यावेळी कार्यक्रमात जि. प. च्या अध्यक्षा संध्या गुरनुले, यांनी म्हटले की, रक्षाबंधनाच्या शुभपर्वावर पालकमंत्री यांच्या माध्यमातुन आशा भगिनींना ही भेट म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे. एवढेच नाही तर दिवसरात्र कष्ट करण-या आशा ताईंना थांबण्यासाठी प्रत्येक आरोग्य विभागात निवारा बांधून द्यावा अशी मागणीही यावेळी संध्याताई गुरनुले यांनी केली. 



याप्रसंगी मंचावर खा. बाळु धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर, जि.प. उपाध्यक्षा रेखाताई कारेकर, जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमणार, जि.प. सदस्य रमाकांत लोधे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. गहलोत उपस्थित होते. सुत्रसंचालन डाॅ. सुरेखा सुत्राडे प्रास्ताविक डाॅ.राज गलहोत, आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डाॅ. गेडाम यांनी केले.