खासदार अशोक नेते यांच्या हस्ते जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या जिल्हा निधीतुन क्षेत्रातील ग्रा.पं. व ग्रामसंघांना विविध साहित्याचे वाटप*




खासदार अशोक नेते यांच्या हस्ते जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या जिल्हा निधीतुन क्षेत्रातील ग्रा.पं. व ग्रामसंघांना विविध साहित्याचे वाटप*

आम. बंटीभाऊ भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त उपकम.*

दिनचर्या न्युज:- नागभीड प्रतीनीधी

चिमुरचे लोकप्रिय आमदार श्री किर्तीकुमार भांगडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते नागभीड पं.स.कार्यालयात जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्या क्षेत्रातील ग्राम पंचायत व ग्रामसंघांना विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य संजय गजपुरे, पं.स. च्या संवर्ग विकास अधिकारी श्रीमती प्रणालीताई खोचरे , गडचिरोली चे भाजपा जिल्हा महामंत्री डॉ भारत खटी, पं.स.सदस्य व भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके , कृऊबास उपसभापती रमेश पाटील बोरकर यांची विशेष उपस्थिती होती.
          आपल्या जि.प.क्षेत्रात विविध विकास कामांचा धडाका लावणारे व नवनविन उपक्रम राबविणारे पारडी- मिंडाळा- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी जिल्हा निधीतुन मंजुर केलेले तीनचाकी कचरागाडी , कचराकुंड्या व सतरंजी ( दरीपंजी ) यांचे वितरण जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत व बचत गटाच्या ग्रामसंघांना खास.अशोकभाऊ नेते यांचे हस्ते यावेळी करण्यात आले.सोबतच उपस्थितांना डेटॉल साबण, सॅनीटायझर व बिस्कीट चे वाटप करण्यात आले. 
         याप्रसंगी उपस्थित सर्व सरपंच , उपसरपंच , झेप प्रभाग महासंघ व क्षेत्रातील सर्वच बचत गट ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय गजपुरे यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले. कोरोनाच्या संकटकाळात लाॅकडाउन सुरु असतांना जिल्हा निधीतुनच सर्व ग्रामपंचायतींना संजय गजपुरे यांनी याआधीच मेगाफोनचेही वाटप केले होते. जिल्हा निधी मंजुर केल्याबद्दल जि.प.च्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले व माजी अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांचे संजय गजपुरे यांनी आभार मानले व लवकरच सर्व ग्रामपंचायतींना “ ट्राॅली स्पिकर सेट “ देण्याची घोषणा केली.
              याप्रसंगी विस्तार अधिकारी नेवारे साहेब, उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम, अमिरखान व अमोल मोडक , जि.प.सर्कल प्रमुख धनराज बावणकर , पं.स.प्रमुख भोजराज नवघडे , कोसंबी गवळी चे सरपंच मच्छिंद्र चन्नोडे , मिंडाळा ग्रा.पं. उपसरपंच  विनोद हजारे , आकापुर च्या माजी सरपंच श्रीमती निताताई बोरकर, अशोक समर्थ , मनोज कोहाड, सचिन चिलबुले, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह सरपंच, उपसरपंच व प्रभागातील ग्रामसंघाच्या महिला पदाधिकारी व सदस्या बहुसंख्येने उपस्थित होते.


दिनचर्या न्युज