दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :आज सकाळी जमजंट्टी जवळील ईरई नदीच्या पात्रात काही रेती उत्खनन होत असल्याची माहिती नायब तहसीलदार धांडे याच्या पथकाला मिळाली. घटणास्थळी गेले असता नदी पात्रात चार टॅकटर रेती उपसा करताना आढळून आले. त्यातील काही रेती तस्करानी नायब तहसीलदार यांच्यावर हल्ला केलाची माहिती सुत्राकडून मिळाली. दिवसान दिवस प्रशासन अधिकारी यांच्यावर रेती माफीयाची मुजोरी वाढ चाली आहे. काही दिवसांपूर्वीच भद्रावती येथे रेती माफीयावर याच प्रकारचा प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभाग कुठे कमी तर पडत नाही ना? म्हणून हे रेती माफीया सराट पणे कोणावरही जीव घेणा हमला करतात.कोण तो हमलावार? व टॅकटर मालक, डायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करणार असे.
तहसिलदार गौड यांना फोन वरून विचारले असता. जमंजट्टीवर आज सकाळी नायब तहसीलदार धांडे यांच्या वर हल्ला झाला आहे. त्याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत. काही टॅकटर तहसीलदार यानी जमा केले आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जात आहे. प्रशासकीय अधिकारी यांच्या असे हल्ले करणा-याना काही केल्या सोडले जाणार नाही. असे तहसीलदार यानी सांगितले.
पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
बातमी लिहित पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
या रेती तस्करावर काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.