वीज ग्राहकांनी सहभागी व्हावे : महावितरणचे आवाहन
दिनचर्या न्युज :- चंद्रपूर
लाकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्य ग्राहकांना वीज बिलाविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व सदर ग्राहकांच्या वीज बिलाविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरण, चंद्रपूर विभागाद्वारे चंद्रपूर, मुल व सावली तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी “आपले वीज बिल समजून घ्या” या विषयावर ऑनलाईन “वेबिणार” चे आयोजन करण्यात आले आहे. तरी चंद्रपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्राहकांनी जास्तीत जास्त (घरगुती व वाणिज्य) सहभाग नोंदवून वीज बिलाविषयी असलेल्या शंकाचे निरसन करून घेण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
मंगळवार दिनांक ३० जून रोजी सकाळी १२:३० ते दुपारी 2:०० या वेळेत घरगुती व वाणिज्य ग्राहकांसाठी होणाऱ्या वेबिणारमध्ये महावितरणने वितरीत केलेले माहे एप्रिल, मे व जून महिन्याचे वीज बिलाविषयी असलेला संभ्रम व समस्यांचे निराकरणहि करण्यात येणार आहे. वेबिणारमध्ये सहभागी होण्याकरिता महावितरणच्या httpshttps://meet.google.com/uik-rjyw-cdn या लिंकवर जाऊन घरगुती व वाणिज्य वीज ग्राहकांना सहभागी होता येईल.
ग्राहकांच्या वीज बिलाविषयी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले वीज बिल समजून घ्या. या वेबिणारमध्ये चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व उपविभागीय अभियंते व बिलिंग विभागाशी संबंधीत अधिकारीहि सहभागी होणार आहेत. याशिवाय https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंकवरहि ग्राहक स्वत: आपल्या वीज बिलाची पडताळणी करू शकतात.