लाँकडाऊन मध्ये नाभिक सलून दुकानदार ठरला आथिर्क संकट, भुखमारीचा बळी!






लाँकडाऊन मध्ये
नाभिक सलून दुकानदार ठरला आथिर्क संकट, भुखमारीचा बळी!

चंद्रपूर, दिनचर्या न्युज :-
सलग तीन महिन्या पासून सलून दुकान बंद, नाभिक समाजावर लाकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे. याच्या पहिला बळी चंद्रपूरात दुर्गापूर येथे काल रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करून घेतली.
दुर्गापूर येथील समता नगर येथे एका सलून व्यावसायिकाने आत्महत्या केली. स्वप्नील चौधरी २७ असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. शेजारी राहणाऱ्या युवकाने आज (१५ जून) सकाळी ७.३० वाजता स्वप्नील अजून उठला नाही म्हणत आवाज दिला.

परंतु काहीही प्रतिसाद मिळत नाही आहे हे बघत शेजारील लोक एकत्रित झाले आणि दार उघडून बघितले असता स्वप्नील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील च्या आई-वडीलांना अगोदरच देवाज्ञा झालेली आहे तो घरी एकटाच राहत होता.

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन झाल्यामुळे सलून व्यवसायाला आथिर्क झळ पाहोचली आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या हा समाज आहे. नाभिक समाजावर आथिर्क संकट त्यामुळे उपासमार होत आहे. त्याच्याच एकबळी स्वप्निल सारखा सलून व्यावसायिकांने आत्महत्या केली. या आत्महत्यामुळे नाभिक समाजात सर्वस्तरावरुन दुख व्यक्त केले जात आहे.