कन्टेनमेंट झोन मध्ये असलेला पाप्पया पोन्नमवार ही काँग्रेसच्या कार्यक्रमात लावली हजेरी !


  • कन्टेनमेंट झोन मध्ये असलेला पाप्पया पोन्नमवार ही काँग्रेसच्या कार्यक्रमात लावली हजेरी !
  • काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच करायला हवी कारवाई ! 

  •  राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांनीच करायला हवे पाप्पय्या ला पदमुक्त ! 
( गडचांदूर विशेष वृत्त)

आज सोमवार दि. २९ जुन रोजी राजुरा काँग्रेस पक्षाचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात वरिष्ठांच्या आदेशानुसार पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे गडचांदुरचे वादग्रस्त स्विकृत नगरसेवक पाप्पया पोन्नमवार यांनी ही हजेरी लावली. नुकतेच दोन दिवसांपूर्वी गडचांदुर मध्ये एक बाधित आढळला. आढळलेला हा बाधित गडचांदुर मधील पाप्पया पोन्नमवार यांच्या घराशेजारच्या असल्यामुळे हे क्षेत्र प्रतिबंधित (कन्टनमेन्ट झोन) घोषित करण्यात आले आहे, प्रतिबंधित क्षेत्रातील स्विकृत सदस्य असलेले पाप्पय्या पोन्नमवार हे काँग्रेसने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित झाले आणि त्यांच्याच पक्षातील एका सुज्ञ पदाधिकाऱ्यांनी त्यांनी त्या ठिकाणाहुन वापस जा असे पिटाळून लावले. शासन स्तरावर आज च्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांनी शासन निर्देशाचे पालन करावे असे आदेश दिल्या जात आहेत. शासनाचे प्रत्येक निर्देश हे समाजसेवक आणि नेत्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येकांनी पालन करायला हवे असा संदेश द्यायला हवा अशी प्रशासनाची मनिषा असते.  आज सोमवार दि. २९ जुन रोजी पेट्रोल व डिझेलच्या झालेल्या दरवाढीविरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने संपूर्ण भारतात आंदोलन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदुर याठिकाणी आम. सुभाष धोटे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात काँग्रेसचे स्विकृत सदस्य असलेल्या पाप्पया पोन्नमवार यांनी हजेरी लावली. कन्टेनमेंट झोन मध्ये असलेल्या पाप्पय्यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करायला हवे, परंतु तसे न करता मुजोर पाप्पयांनी याठिकाणी आपली हजेरी दर्शविली, आणि त्यांच्याच पक्षाच्या एका सुज्ञ पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्याठिकाणाहुन बाहेर जाण्याचा संदेश दिला, हे वरिल छायाचित्रावरून स्पष्ट होत आहे. शासकीय निर्देशांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे. शासकीय निर्देशांची फक्त पालनचं करायचे नाही, त्याची जनजागृती ही करायची आहे, ही जबाबदारी प्रशासनासोबतचं राजकीय पुढारी आणि समाजसेवकांची ही आहे. या कर्तव्याचे पालन सगळ्यांनीच करायला हवे. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या ही एक-दोन नाही तर ७-१० अशी वाढत आहे, यासाठी शासन निर्देशांचे पालन व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पाप्पय्या पोत्रमवार सारखे सामाजिक क्षेत्रात वावरणारे राजकीय व्यक्ती जर या आव्हानाला तिलांजली देत असतील तर त्यांच्यावर त्यांच्याच पक्षाने कार्यवाही करायला हवी, हे अपेक्षित आहे. , याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री, त्या क्षेत्रातील आदरणिय आमदार सुभाषजी धोटे यांनीच करायला हवा. आजच्या आम. सुभाष धोटे यांच्या कार्यक्रमात कन्टेनमेन्ट झोन मध्ये असलेला पाप्पया हजेरी लावतो. शासनाचे निर्देश हे सर्वसामान्यांसाठीच आहेत का ? चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आपल्या अधिकारातर्गत घ्यायलाचं हवा ? गडचांदुर नगर पंचायतच्या अति विद्वान मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी यावर निर्णय घेवून पाप्पया सारख्या हुशार मानसाला त्यांची जागा दाखवायलाच हवी.
दिवसेंदिवस चंद्रपुरातील कोरोनाबाधिता़ची संख्या वाढत आहे‌ सामान्य जनता आज पूर्णपणे लढत आहे आणि पापय्या पोन्नमवार सारखे शहाणे लोक त्या जबाबदारीला नाकारतात, प्रशासनाने अशा बेजबाबदार व्यक्ती़वर कारवाई करायला चं हवी.