नागरिकांनी कामाव्यतिरिक्त
बाहेर पडू नये: जिल्हाधिकारी
चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एक पॉझिटिव्ह;
एकूण बाधीतांची संख्या 44
Ø बालके व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी
Ø शनिवारला एक अहवाल पॉझिटिव्ह
Ø ॲक्टिव बाधीतांची संख्या 21
Ø आतापर्यंत 23 बाधीत कोरोना मुक्त
चंद्रपूर, दि.13 जून: चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात आणखी एक कोरोना बाधित आढळून आला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या 44 झाली आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित्रा नगर तुकुम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात आयएलआय संशयित 57 वर्षाच्या नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे दिसल्यामुळे काल त्यांच्या स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यात आली होती.आज या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
चंद्रपूर शहरांमध्ये यापूर्वी बुधवारी तुकूम परिसरातील सुमित्रा नगर भागातीलच रहिवासी असणारे 45 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आलेल्या बाधीतामुळे महानगरपालिका यंत्रणेने तपासणी मोहीम आणखी सखोल केली आहे.
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 21 झाली आहे. यापैकी, 19 बाधीत कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती आहे तर 2 बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेला आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, कोरोनाच्या काळामध्ये बालके व वृध्दांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण 23 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 12 कंटेनमेंट झोनचे 14दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 11 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण 21 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 54 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 51 नमुने निगेटिव्ह व 3 नमुने प्रतीक्षेत आहेत.
सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.
कोविड-19 संक्रमित 44 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधीतांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -2, हरियाणा (गुडगाव)-1,हैद्राबाद-1, मुंबई-7, ठाणे -3, पुणे-6, यवतमाळ -4, नाशिक -3, गुजरात-1, जळगांव-1, ओडीसा-1, प्रवासाचा कोणताही प्रकारचा इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती - 10 आहेत.
जिल्ह्यामध्ये 2 हजार 174 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 44 नमुने पॉझिटिव्ह, 1 हजार 982 नमुने निगेटिव्ह, 132 नमुने प्रतीक्षेत तर 16 नमुने अनिर्नयीत आहेत.
जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 226 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 496नागरिक,तालुकास्तरावर 436 नागरिक तर, जिल्हास्तरावर 294 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत परराज्यातून,जिल्ह्यातून 77 हजार 348 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 72हजार 980 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 4 हजार 368 नागरिकांचे गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
जिल्ह्यात,शहरात नागरिकांमध्ये लक्षणे आढळून आल्यास तसेच कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी,माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या एकात्मिक रोग संरक्षण प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7बाधीत),24 मे ( एकूण 2 बाधीत), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ), 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत), 5 जून ( एक बाधीत),6 जून ( एक बाधीत), 7 जून ( 11 बाधीत),9 जून ( एकुण 3बाधीत),10 जून ( एकुण एक बाधीत) आणि 13 जून ( एकुण एक बाधीत),अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 44 झाले आहेत. आतापर्यत 23 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 44 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 21 आहे.
दिनचर्या न्युज