आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल येथील सलुन व्यावसायिकांना प्लास्टीक मास्क, डेटॉल लिक्वीड बॉटल, कापडी मास्कचे वितरण
दिनचर्या न्युज :मुल प्रतिनिधी -
मुल:-
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहरात हेअर कटींग सलुनमध्ये प्लास्टीक मास्क, डेटॉल लिक्वीड बॉटल, कापडी मास्क चे वितरण भाजपा पदाधिका-यांच्या माध्यमातुन करण्यात आले.
मुल शहरातील हेअर कटींग सलुन व्यावसायिकांनी लॉकडाऊन शिथील होताना हेअर कटींग सलुनची दुकाने काही विशिष्ट वेळात सुरू करावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांच्याकडे केली होती सदर दुकाने आता सुरू करण्यात आली असून व्यवसाय करताना खबरदारीचा उपाय म्हणून आ. मुनगंटीवार यांनी सदर व्यावसायिकांना प्लास्टीक मास्क, डेटॉल लिक्वीड बॉटल, कापडी मास्क भेट म्हणून पाठविले आहेत. त्या माध्यमातुन व्यवसाय करताना त्यांना सुरक्षा उपलब्ध व्हावी यादृष्टीने आ. मुनगंटीवार यांनी हा पुढाकार घेतला आहे. हे साहित्य वितरीत करताना भाजपा पदाधिका-यांनी सोशल डिस्टंसींग काटेकोरपणे पाळले. यावेळी मुल भाजपाचे नगर परिषद उपाध्यक्ष नंदू रणदिवे, अजय गोगुलवार, प्रशांत बोबाटे, प्रशांत समर्थ, प्रकाश धारणे, चंद्रकांत मनियार, डॉ. मंगेशग गुलवाडे, नाभीक समाज अध्यक्ष किशोर सुत्रपवार, उज्वल धामनगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शहरातील 35 सलुन दुकानांमध्ये हे साहित्य वितरीत करण्यात आले.