नाभिक समाजाला आर्थिक मदत व तीन महिन्याचे वीज बिल माफ करा :
आमदार प्रतिभाताई धानोरकर
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान मांडला आहे. सर्वत्र या विषाणूने हाहाकार माजलेला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाउन घोषित केले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापासून नाभिक समाजाचे केसकर्तन व्यवसाय बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक मदत, तीन महिन्यांचे वीज बिल माफ व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाउन जाहीर केले. त्या सोबतच केसकर्तन व्यवसायामुळे या विषाणूच्या प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या. परंतु या व्यवसायावर हजारो कुटुंब जीवन जगात होते. त्यांच्यावर मात्र आता उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाजातील ५० टक्क्याहून अधिक केसकर्तन करणारा कारागीर हा फुटपाथ, शासकीय जमीन किंवा किरायाच्या खोलीत आपले दुकान मांडून हातावर आणून पानावर खाणे असा हा समाज आजवर उपजीविका भागावित होता.
परंतु मागील काही महिन्यापासून काम बंद असल्यामुळे जीवन जगायचे कसे असा प्रश्न या समाजापुढे पडला आहे. त्यामुळे त्यांना पाच हजार रु. प्रति महा. आर्थिक मदत, तीन महिन्याचे वीजबिल माफ तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे.
दिनचर्या न्युज