मनपा राबवीत आहे डीप क्लीनिंग ' मोहीम.





मनपा राबवीत आहे डीप क्लीनिंग ' मोहीम. 
  
चंद्रपूर १५ एप्रिल - कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे १५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मिलन चौक येथुन  ' डीप क्लीनिंग ' मोहीम सुरु करण्यात आली. मिलन चौक  ते जटपुरा गेट व धांडे हॉस्पीटल ते क्राईस्ट हॉस्पीटल या शहराच्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर साफसफाई करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. ' डीप क्लीनिंग ' मोहीमे अंतर्गत पहील्यांदा परिसर झाडुन स्वच्छ केल्या गेला, जमा झालेला कचरा तात्काळ उचलल्या जाऊन निर्जंतुकीकरण करण्यासाठी रस्त्यावर व परिसरातील दुकानांवर फवारणी करण्यात आली तसेच मार्गातील एटीएम केंद्राचीही पूर्णतः स्वच्छता करण्यात आली त्यानंतर ब्लिचिंग पावडर टाकून परीसर पुर्णपणे स्वच्छ व निर्जंतुक राहील याची काळजी घेण्यात येऊन डीप क्लीनिंग ' मोहीम राबविण्यात आली. यापुढे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर ही मोहीम राबविली जाणार आहे.  
   सद्यस्थितीत चंद्रपूर शहरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. मात्र राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे युद्ध स्तरावर सफाई मोहीम राबविली जात आहे. भविष्यात उद्भवणारी आपात्कालीन सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य व सफाई कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. शहर निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने युद्ध स्तरावर सम्पूर्ण शहरात फवारणी, धुरळणी, आवश्यक ठिकाणी जनतूनाशक पावडरचा  छिडकाव सुरू केलेला आहे, बाजार,रेल  स्टेशन,बस स्टँड, वर्दळीच्या ठिकाणी, पब्लिक कम्युनिटी टॉयलेट ,दवाखाने येथे फवारणी धुरळणी व निर्जंतुकीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.    
   कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने पसरत असताना आता संपूर्ण देशात, राज्यात संचारबंदी लागू झाली आहे, नागरिकांनी आपली काळजी स्वतः घ्यायची आहे, या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू साठी घराबाहेर पडा, परंतु गरज नसताना घराबाहेर निघू नये असा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. जनतेचे आरोग्य योग्य व सुदृढ रहावे म्हणून  देशासाठी सेवा प्रदान करणारे  मनपा कामगार अहोरात्र परिश्रम घेत आहेत.