नागभीड तालुक्यातील हमाल बांधवांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरक्षा कीटचे वितरण.
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज :-
भाजपा नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री व आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नागभीड तालुक्यातील शासकीय गोदामात अहोरात्र काम करणा-या हमाल बांधवांना कोरोना व्हायरस पासुन सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले
कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी या सुरक्षा किट च्या माध्यमातुन जागृती करण्यात येत आहे. या किट मध्ये हमाल बांधवांसाठी मास्क, सॅनिटायझर व हॅण्डवाश लिक्विड चा समावेश आहे. या गोडावुन मध्ये सातत्याने सार्वजनिक वितरण प्रणाली साठी आवश्यक अन्नधान्याची साठवणुक करणे व गावागावात वितरण करणे सुरु असते. ही बाब लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेतर्फे या सुरक्षा किट चे वितरण सुरु केलेले आहे. आज तालुक्यातील नागभीड व तळोधी (बाळा.) च्या शासकीय गोदामामध्ये या सुरक्षा किटचे वाटप भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य तसेच जिल्हा अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य संजय गजपुरे व नागभीड नगरपरिषद चे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रपुर जिल्हा हमाल माथाडी लेबर युनियन चे उपाध्यक्ष जीवन प्रधान, गोडावुन किपर अविनाश गेडाम,संगणक चालक सुमित खोब्रागडे , नागभीडचे माजी ग्रा.पं. सदस्य मनोज कोहाड, विनोद गिरडकर यांची उपस्थिती होती.