नागभीड-नागपुर रेल्वे ब्राॅडगेज मार्गासाठी त्वरीत निधी उपलब्ध करुन द्या - खास.अशोक नेते व ZRUCC सदस्य संजय गजपुरे



नागभीड-नागपुर रेल्वे ब्राॅडगेज मार्गासाठी त्वरीत निधी उपलब्ध करुन द्या - खास.अशोक नेते व ZRUCC सदस्य संजय गजपुरे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर :-
   पिंक बुक मध्ये निधीची तरतुद केली नसल्याने नागभीड-नागपुर रेल्वे ब्राॅडगेज मार्गासाठी त्वरीत निधी उपलब्ध करुन देण्यात यावा यासाठी आज गडचिरोलीचे खास.अशोक नेते व ZRUCC सदस्य संजय गजपुरे यांनी रेल्वेमंत्री पियुषजी गोयल यांची नवी दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात भेट घेऊन याची मागणी केली.
      नागभीड- नागपुर या ब्राॅडगेजसाठी एकुण ९२२ कोटी रु.चा खर्च अपेक्षित असुन यातील अर्धा वाटा उचलण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एका संयुक्त कंपनीचीही स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्या पुढाकारामुळे या ब्राॅडगेज मार्गाचे विद्युतीकरणासह दोन वर्षात काम पुर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
      ११३ वर्षापासुन सुरु असलेली दक्षिण पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत येत असलेली नागभीड - नागपुर नॅरोगेज रेल्वेगाडीला ब्राॅडगेज मार्गाचे काम सुरु करण्यासाठी २५ नोव्हेंबर २०२० ला खास . अशोकभाऊ नेते यांचे व शेकडो प्रवाशांचे उपस्थितीत नागभीड रेल्वेस्थानकावरुन अखेरची विदाई देऊन बंद करण्यात आले. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होणार ही आशा पल्लवीत झाली. दरम्यान रेल्वे प्रकल्पासाठी २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची माहिती देणारे “ पिंक बुक “ रेल्वे बोर्डाने ५ फेब्रुवारी २०२० ला प्रकाशित केले.
         मात्र या पिंक बुक मध्ये नागभीड- नागपुर ब्राॅडगेज प्रकल्पासाठी निधीची तरतुदच केली नसल्याचे लक्षात येताच या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार व द.पु.म. रेल्वे बिलासपुर झोनचे ZRUCC सदस्य तथा भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी तातडीने रेल्वेमंत्री पियुषजी गोयल यांची आज शुक्रवारी रेल्वे मंत्रालयात भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली 
       २५ नोव्हेंबर २०२० पासुन हा नॅरोगेज रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. एकदा रेल्वेमार्ग बंद करण्यात आल्यावर तीन वर्षात नविव मार्गावर गाडी सुरु करणे अनिवार्य आहे. पण पिंक बुक मध्ये या प्रकल्पासाठी निधीची तरतुदच केली गेली नसल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे निदर्शनास ही बाब यावेळी झालेल्या चर्चेत लक्षात आणुन देण्यात आली. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी त्वरीत याची दखल घेत या मार्गासाठी आवश्यक निधीची तरतुद करण्याबाबत सकारात्मक निर्देश दिले. 
      रेल्वेमंत्री पियुषजी गोयल यांना निवेदन देतांना व चर्चेच्या वेळी खास.अशोकभाऊ नेते , चंद्रपुरचे जि.प.सदस्य संजय गजपुरे , गडचिरोली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष दामोधर अरगेला, मनोज कोहाट, विनोद गिरडकर यांची उपस्थिती होती.