स्वच्छतेचे दुतच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर!
चंद्रपूर -
महाराष्ट्रातील ख्यातनाम महापुरुष ज्यांनी निसर्गातील मळा सोबतच मानवातील घाण दूर करून स्वच्छतेचा नारा दिला.
अशा राष्ट्रसंत गाडगे महाराजांची प्रतिमा जिल्हा प्रसिद्ध जिल्हा परिषदेच्या एका कक्षामध्ये कचऱ्याच्या ढिगावर धुळीने माखले अवस्थेत पडली आहे.
करणाऱ्या स्वच्छतेच्या गाजावाजा करणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयात स्वच्छतेचे दूत संत संत गाडगेबाबा यांची प्रतिमा कचर्याच्या ढिगार्यात दिसून येत आहे. ज्या संताने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताला स्वच्छतेचा मंत्र दिला. निसर्गातील घानच नव्हे तर मानवातील घाण सुद्धा काढून आपल्या प्रबोधनाद्वारे संपूर्ण भारत देशालाच स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगेबाबा झेडपीच्या नाकर्तेपणामुळे गाडगे बाबाची प्रतिमा कचऱ्याच्या ढिगावर धुळीने माखलेल्या अवस्थेत पडली आहे.
स्वच्छतेचे पारितोषिक घेणारी जी.प.आज स्वतः संत गाडगेबाबाच्या प्रतिमेची अवहेलना करीत आहे. याच मिनी मंत्रालयातून संपूर्ण योजनांचे जिल्हाभर कारभार चालत असते. मात्र स्वतः जिल्हा परिषद मध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता सतीशभाऊ वाजुरकर यांनी जिल्हा परिषदेच्या नाकर्तेपणावर आरोप केला आहे.