भिवापुर वार्डात घराला आग लागल्याने संपूर्ण सामान जळून खाक
भिवापूर वार्डात नुरानी मजीदच्या मागे अचानक धनंजय विठ्ठल कौहुरके यांच्या घराला आग लागली. आगीत संपूर्ण घरातील सामान जळून खाक झाले. मात्र आग विझवण्यासाठी आलेले अग्निशामक यंत्र जाण्यास निष्फळ ठरले. वार्डातील अतिक्रमणामुळे कुठे आग लागली तर अग्निशामक यंत्र जाण्याइतपतही रस्ता नसल्याने या परिसरात संपूर्ण रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे चार चाकी वाहन जाण्या एवढी जागा राहीली नाही. भविष्यात मोठी आग किंवा दुर्घटना झाल्यास या वार्डातील नागरीकाना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. मनपा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढेल का? हा प्रश्न या निमित्ताने जनतेसमोर येत आहे.