चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनधिकृत कोळसा टाल बंद करून कोळसा माफियांना अटक करा, मनसेची केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे तक्रार !

कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह ?

कोळशा घोटाळा :-


चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनधिकृत  कोळसा टाल बंद करून कोळसा माफियांना अटक करा, मनसेची केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे तक्रार !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोळसा खाणींसाठी देशात  प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील डब्ल्यूसीएल खाणीतून निघणारे ट्रक व हायवा ट्रक हे अनधिकृत कोल डेपो मधे खाली होऊन कोट्यावधीची कोळसा चोरी होतं असल्याने असे कोल डेपो तत्काळ बंद करून कोल माफियांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी एका निवेदनातून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केंद्रीय कोळसा मंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे.व सोबतच कोल माफिया कैलास अग्रवाल यांचे अवैध कोळसा ट्रक सापडले असतांना सुद्धा त्यांना पोलिसांनी ताब्यात कां घेतले नाही? असा प्रश्न सुद्धा मनसे कडून विचारला जात असून तपासात त्यांना स्थितिलता दिल्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चार दिवसांपूर्वी चंद्रपूर तालुक्यातील नागाडा परिसरातील एस.एस कोल डेपो, बजरंग कोल डेपो आणि इतर कोल डेपो हे अनधिकृतपणे सुरू असतांना तिथे चोरीच्या कोळशाचे अगोदर दोन ट्रक आणि नंतर तब्बल २० ट्रक पकडल्या गेले असून मागील वर्षी असल्या कोल डेपोना हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. पण कोल माफियांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता पुन्हा नव्याने नवीन ठिकाणी आणि काही कोल माफियांनी तर अगोदरच्याच जागेवर कोल डेपो सुरू केले. आता नुकत्याच पोलिस कारवाईमधे बजरंग कोल डेपो व कैलास अग्रवाल यांच्या एसएस कोल डेपोमधून तब्बल २२ ट्रक जब्त केले आहे जे वेकोलितून सरळ ऊद्दोग कंपनी मधे जाणारे होते तो कोळसा इथे उतरविला जात होता.
खरं तर नुकताच काही महिन्यांपूर्वी कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतून ४ लाख टन कोळसा चोरी प्रकरणाची चौकशी थंड बस्त्यात असतांना आता एवढे चोरीचे ट्रक पकडल्या गेले आहेत ज्यामध्ये चौकशी केल्यास या अनधिकृत कोल डेपोच्या माध्यमातून कोट्यावधीचा कोळसा घोटाळा बाहेर येऊ शकतो.आणि जिल्ह्यातील कोल माफियांनी जी राष्ट्रीय संपत्तीची लूट चालविली आहे आणि त्यामधे काही वेकोलि अधिकारी गुंतले आहे त्यांचा सुद्धा पर्दाफाश होऊ शकतो, करिता या अनधिकृतपणे चालत असलेल्या सर्व कोल डेपोना तत्काळ बंद करून कोळसा चोरीत गुंतलेल्या सर्वावर फौजदारी कारवाई करून राष्ट्रीय सम्पतीला वाचवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा सर्वच या कोळसा चोरी प्रकरणात आहे असे समजून पुराव्यानिशी राष्ट्रीय सतर्कता आयोग इथे तक्रार देऊन सर्वावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केंद्रीय कोळसा मंत्री यांना दिला आहे. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांना सुद्धा देण्यात आल्या.