अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टाटा सुमोचा अपघात 11 प्रवासी जखमी


चिमूर शंकरपूर कांपा मार्गावरील खैरी जवळ टाटा सुमो एम एच 19 ए इ 7301ही अवैध प्रवाशी घेऊन सकाळी 10 वाजता कानपा कडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. त्यात 11 प्रवासी जखमी झाले असून त्यातील 4 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे.

शंकरपूर येथील टाटा सुमो वाहन क्रमांक एम एच 19 एइ 7301 हे वाहन प्रवासी घेऊन कानपा ला निघाले होते खैरी जवळ आले असता वाहन चालक राजीक शेख यांचे वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली . त्यात वाहन चालक राजीक शेख( 22 ),कविता गोपीचंद मेश्राम (46), गोपीचंद नथु मेश्राम( 50) ,सुमन शालीक डहाके (64 ),शालीक डहाके( 70), प्रभाकर दाघो बारेकर (60), वरील सर्व राहणार शंकरपूर येथील आहे तर आंबोली येथील कांशीराम गोविंदा ठाकरे( 40),व कांता कांशीराम ठाकरे( 34) ,चांदी येथील आडकू तिकडू मारबते (65), जवळी येथील लक्ष्मण ननावरे( 65), कवडशी देश येथील दिनकर पांडुरंग देशमाने हे जखमी झाले असून त्यांना शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता त्यातील जखमींना चिमूर, चंद्रपूर व नागपूर ला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जांभळे, फौजदार लोटकर, खोब्रागडे, पोलीस शिपाई नागरगोचे करीत आहे. अपघात पाहण्यांकरीता घटनास्थळी या परिसराततील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अवैध वाहतूकीकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.