जुन्या पैश्याच्या वादातून विमल गिरी नामक तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्त्या


 बल्लारपूर शहरातील चुनाभट्टी वॉर्ड येथे जुन्या पैश्याच्या वादातून विमल गिरी नामक तरुणाची  कुऱ्हाडीने वार करून हत्त्या करण्यात आल्याची घटना आज 30जानेवारी रात्री 10वाजता उघडकीस आली.

जुन्या पैश्याच्या वादातून ही हत्या झाली असल्याचे चर्चिले जात असून एक आरोपी कुलदीप तिवारी यास बल्लारपूर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. 

फिर्यादी नामे सिमा विमल गिरी वय ३६ वर्ष रा वार्ड कंमाक ०६ चुनाभटटी विसापुर यांनी पोस्टे बल्लारशाह येथे येउण रिपोर्ट दिला की,आरोपी
नामे कुलदिप तिवारी याने फिर्यादी यांचे पती नामे विमल गिरी यास आरोपी विरूध्द यापुर्वी साक्ष दिली तसेच आज रोजी नंदु यादव याची कोर्टात साक्ष होती व मृतक हा नंदु यादव सोबत कोर्टात गेला म्हणुन त्याचा राग येउण आरोपी याने फिर्यादीचे पती नामे विमल गिरी याचे डोक्यावर व चेह-यावर वार करूण जिवाणीशी ठार मारले वरूण पोस्टे बल्लारशाह येथेअप.क.९२/२०२० कलम ३०२ भादवी प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.