बिनबां गेट ते चोराळा जाणाऱ्या रस्तावर दोन ट्रक फसले,वाहतूक खोळंबली!


 



बिनबां गेट ते चोराळा जाणाऱ्या रस्तावर दोन ट्रक
             फसले,वाहतूक खोळंबली!
चंद्रपूर -  अनेक वर्षांपासून  बिनबां गेट ते चोराळा  मार्ग हा अतिशय खड्डेमय झाला. या रस्त्यावरून साधे पायदळ चालणेही नागरिकास कठीण झाले होते.  या रस्त्यावर जाणाऱ्या अनेक गावाचा मार्ग असल्याने येथून अनेक मोठे वाहने जात असतात.  अशातच सोमवारला दुपारी साडेचार वाजता दोन  समोरासमोर  ट्रक आल्याने  दोन्ही साईडला ट्रक फसले गेले.  त्यामुळे दोन्ही कडील वाहतूक बंद पडली.  त्यामुळे गावाकडे व शहरात येणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.  काही दिवस आगोदरच या रस्त्याचे गावात नसलेले आमदार यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु आज तयात  या  रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो गावांच्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागतात.  दाताळा मार्ग बंद असल्यामुळे सर्व जळ वाहतूक चोराळा मार्गे चंद्रपूरला येत असते.  या मार्गावरील वाहतूक वाढल्याने व संबंधित रस्ता वर्षानुवर्ष खड्डेमय असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.  या रस्त्याकडे  संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात हरी दुर्घटना होण्याअगोदर या रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी चोराळा, दाताळा, वेडंली, धानोरा, पिंपरी, या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो गावातील नागरिकांनी केली आहे.