शेतकऱ्यांसाठी नाविण्यपुर्ण योजना राबविणार:अविनाश पाल

सावली/प्रतिनिधी:

शेतक-यांनी आपल्या शेतीमध्ये पिकलेल्या शेतमालाची विक्री तालुक्यातील मार्केट यार्डवरच करावी असे आवाहण कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी चे सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. 
कृषी उत्पन्न बाजार समिती सावली च्या वतिने उपबाजार व्याहाड खुर्द येथे सातबारा ला मार्केट यार्ड वर्षपुर्ती निमीत्य भव्य शेतकरी स्नेहमिलन, मार्गदर्शन मेळावा व धनादेश वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी चे सभापती अतुल गण्यारपवार, स्वागताध्यक्ष बाजार समिती सावलीचे मुख्य प्रशासक अविनाश पाल, उपमुख्य प्रशासक विनोद गड्डमवार, श्रीकांत भृगुवार, देवराव मुद्दमवार, दयाकर गड्डमवार, दिलीप ठिकरे, पुनम झाडे, अर्जुन भोयर, सचिन तंगडपल्लीवार, गुरूदेव भुरसे, शोभा बाबनवाडे, पुष्पा शेरकी, खापरे सचिव चामोर्शी, भुवन सहारे, शरद सोनवाने, अरून पाल, ढिवरूजी कोहळे, शामराव सिडाम, दिनेश घेर प्र. सचिव आदिची उपस्थिति होती, यावेळी बोलताना मागील सातबाराला सावली बाजार समितीच्या माध्यमातुन शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हनुन मार्केट यार्ड सुरु करण्यात आले होते ते उद्देश काही प्रमानात सफल झाले, त्या वर्षपुर्ती निमीत्य कार्यक्रमाचे आयोजन करून तारन योजनेत सहभागी शेतक-याना धनादेश वितरण करण्यात आले व बाजार समितीच्या उत्पन्नातुन शेतक-यांच्या गुनवंत मुलांचा बक्षीस देऊन सत्कार करणार, जे शेतकरी मार्केट यार्डवर माल विकतात त्या शेतक-यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह निधी देवुन मदत करणार, शेतकरी पुञासाठी उच्च शिक्षणासाठी स्कालरशिप देणार असे अविनाश पाल यांनी सांगीतले, यावेळी अनेक मान्यवरांचे समायोचित भाषणे झालीत. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितिचे प्रशासक पुनम झाडे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन रोहणकर यांनी मानले व अल्पोहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.