प्रेमसंबंधात राग अनावर झाल्याने वाढदिवसाच्या दिवशी केली त्याने आत्महत्या

चंद्रपूर/प्रतिनिधी:

प्रेमात राग अनावर झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील खेडेगाव येथील युवकाने आपल्या स्वतःच्याच वाढदिवशी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. संदीप शंकर जांभूळे असे नाव असून मृताचे वय 27 वर्ष होते. संदीप ते एका मुलीसोबत प्रेम संबंध असल्याचे बोलल्या जात आहे.

संदीप हा चिमूर सीएमपीडीआय येथे कंत्राटी बेसवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. मात्र तो अनेक दिवसापासुन विवंचनेत होता. रविवारी दु. दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या छतावर मोबाईलवर बोलत होता. कालांतराने खाली उतरून घराचा दरवाजा बंद करून दोर बांधून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. आई जेव्हा दुपारी संक्रांतीचे वान घेवून घरी परतली तेव्हा तिला संदीपने गळफास लावल्याचे दिसले. 

घटनास्थळी पोलिस चार वाजण्याच्या सुमारास पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून मृताचे प्रेत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले आहे. पोलिसांनी संदीपचा मोबाइल जप्त केला असून मृत संदीपचा आजच जन्मदिवस होता. मात्र मृतकांच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करत आहे