गणेश शिक्षण संस्थेत कार्यकारी समिती स्थापन


मनोज चिचघरे/भंडारा(पवनी)प्रतिनिधी
पवनी तालुक्यातील भेंडारा चौरास येथील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गणेश शिक्षण संस्था वाद धर्मदायआयुक्त नागपूर यांनी बदल अर्जास दिलेल्या मंजुर आदेशामुळे देण्यात आलेल्या संस्थाचा निकाल गणेश शिक्षण संस्था भेंडारा चौरास यांचे अध्यक्ष युवराज,उपाध्यक्ष पारधी, सचिव पुष्पा बांगळकर,कुंडलीक बांगळकर,सहसचिव ,सोनु काटेखाये, निरीक्षक, देवेंद्र गायकवाड, सदस्य -प्रमोद पारधी, सदस्य, -हर्षल गायकवाड यांची कार्यकारणी अस्तित्वात असून कोणत्याही प्रकारचा वाद संपुष्टातन येता तो निर्णय गणेश शिक्षण संस्था भेंडारा यांच्या सचिव पुंडलीक विश्वनाथ बांगळकर सचिव गणेश शिक्षण संस्था भेंडारा चौरास यांच्या बाजूने लागलेला आहे, पण एके काळी विरुद्ध पार्टीने स्वतःचे वर्चस्व दाखवण्यासाठी वर्तमानपत्रात दिनांक ०१/१२/२०१८ शनिवारी माहिती दिली ती सर्व खोट्या प्रकारची असुन लोकांना किंवा जनतेला दिशाभूल करण्याचा एक कलह होता,व १४ वर्षा पासून सुरु असलेल्या वाद धर्मदाय आयुक्त नागपूर यांनी अंतिम निर्णय देऊन यामध्ये ३७५ के, यू, चा, २००९ते २०१२ मध्ये त्यांचे संपूर्ण अधिकार बेकाम झालेले आहेत तरी वर्तमान पत्रात दिनांक ०१/१२/२०१८चे वर्तमानपत्रात आलेल्या पंढरी सेलोकर यांच्या मंडळासोबत कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये केल्यास संस्था जबाबदार राहणार नाही, असे (पुंडंलीक विश्वनाथ बांगळकर सचिव गणेश शिक्षण संस्था भेंडारा चौरास यांनी सांगितले.