दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशन बल्लारपूर द्वारा विविध ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न

चंद्रपुर/प्रतिनिधी:

लोककल्याण समाज सेवा केंद्र बल्लारपूर व दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशन बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद बल्लारपूर व पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्या परवानगीने म्युझिकल डॉन्स व मॅसेज जाग्रुत कार्यक्रम सरकारी दवाखाना ' जुना बस स्टॅण्ड ' राजूरा बस स्टॉप' तीन नंबर नाका येथे कार्यक्रम सादर करण्यात आले. 
हा कार्यक्रम यशस्वी घडवून आणण्याकरिता फादर जोबिन (संचालक) लोक सम्राट संस्था बल्लारपूर सिस्टर्स जया संचालिका दिलासाग्राम सोबतच इतर कर्मचारी तसेच कलाभवन येथील विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नवीन उपक्रमाच्या माध्यमाने एच. आय. व्ही. एड्स बाबत जनजाग्रुती केली. या कार्यक्रमाला लोकांनी सुद्धा चांगलाच प्रतिसाद दिला. तसेच दिलासाग्राम संस्थेमार्फत राजूरा तालुक्यातील चुनाळा ' अहेरी येथे पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करण्यात आले. तसेच बल्लारपूर व पोंभुर्ना तालुक्यातील मानोरा ' आंबेधानोरा ' बोर्डा झूलूरवार ' दहेली येथे शालेय विद्यार्थी तसेच शिक्षकव्रुँद यांच्या सहकार्याने गावात एच.आय.व्ही. एड्स प्रतिबंध जाग्रुत रॉली काढून लोकांमध्ये जाग्रुता घडवून आणण्याचे कार्य केले.