अव्हेल कॉन्वेंटमध्ये ४० नागरीकांनी केले रक्तदान


वेल ट्रीट हॉस्पिटलतर्फे ३०० विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
येथील शाश्वत बहुउद्देश्यीय शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या अव्हेल कॉन्वेंटच्या पटांगणात संस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमीत्य लाइफ लाइन ब्लड बँक तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करुण एकूण ४० नागरीकांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व पूर्ण केले. तसेच या कार्यक्रमात वाडीतील वेलट्रीट हॉस्पिटल तर्फे समाजातील लहान मुले तसेच कॉन्वेंटचे विद्यार्थी व पालकांची एकूण ३०० जणांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार देण्यात आला .
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजय करंडे होते . यावेळी मुख्याध्यापिका कोमल हाडगे,संस्थेचे सचिव , प्रा. अजय मनकवडे ,वेलट्रीट हॉस्पिटलचे डॉ. सुशांत मुळे , लाइफ लाइन ब्लडचे डॉ . अपर्णा सागरे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण चवडे , संचालन प्रा. विजय कटरे यांनी केले . आभार अमित कन्नाके यांनी मानले . आयोजनासाठी संस्थेचे सदस्य सतीश रेवतकर, योगेश निकम, केतन चंदननखेड़े, आशीष मनकवडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.