महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर

डाॅ. विजया जोशी, डाॅ. शैलजा रानडे, डाॅ. हंसश्री मराठे, दुर्गा पारखी पुरस्काराने सन्मानित 

 नागपूर- संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन, प्रकाशन, अध्ययन, अध्यापन आणि संस्कृत विषयक तसेच संस्कृत भाषा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व करणाÚया मान्यवरांना महाराष्ट्र शासनातर्फे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. हे पुरस्कार राज्यातील सात तर अन्य राज्यातील एका विद्वानाला प्रदान करण्यात येतात. सन 2016 व 2017 करिता महाराष्ट्र शासनातर्फे नुकतेच  महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 
महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार संस्कृत प्राध्यापक संवर्गा अंतर्गत आर्. एस्. मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयातील माजी संस्कृत विभाग प्रमुख आणि संस्कृत विदुषी डाॅ. विजया रामचंद्र जोशी आणि पुणे विद्यापीठातील माजी संस्कृत विभागाध्यक्षा व विदुषी प्रो. सरोजा भाटे यांना जाहीर झाला आहे.  संस्कृत  शिक्षक संवर्गा अंतर्गत यवतमाळच्या डाॅ. शैलजा मधुकर रानडे व नागपूरच्या श्रीमती दुर्गा अरविंद पारखी यांना तर संस्कृत कार्यकर्ता अंतर्गत नागपूरच्या डाॅ. हंसश्री सतीश मराठे यांना जाहीर झाला आहे.
डाॅ. विजया जोशी यांना 25 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून त्या संस्कृत भवितव्यम् या नागपूरहून प्रकाशित साप्ताहिकाच्या नियमित लेखिका व विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका आहेत.  डाॅ. शैलजा रानडे या भागवतावरील रसाळ प्रवचनांसाठी सुविख्यात आहेत. तसेच विविध संस्कृत संभाषण शिबीरांमध्ये मार्गदर्शन, अध्यापन करतात. यवतमाळ मध्ये संस्कृत भाषा विषयक उपक्रम राबविण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. श्रीमती दुर्गा पारखी या विद्यार्थीप्रिय संस्कृत शिक्षिका आहेत.  डाॅ. हंसश्री मराठे यांचे नागपुरातील संस्कृत विषयक कार्य, मार्गदर्शन, विविध व्याकरणविषयक लेखन सातत्याने सुरू असते. संस्कृत भाषा प्रचारिणी सभेतर्फे आयोजित परीक्षांच्या  संचालनाची धुरा त्या सुचारुरित्या सांभाळीत आहेत. विदर्भातील डाॅ. विजया जोशी, डाॅ. शैलजा रानडे, श्रीमती दुर्गा पारखी आणि डाॅ. हंसश्री मराठे यांच्या संस्कृत कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून पुरस्काराद्वारे सुयोग्य सन्मान केला आहे अशी भावना सर्वत्रा व्यक्त होत आहे. या सर्वांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने विदर्भातील संस्कृत क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रू. 25000/- रोख, शाल, श्रीफळ व सन्मानपत्रा असे असून शासनातर्फे आयोजित एका स्वतंत्रा कार्यक्रमात हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येतील असे शासनाच्या परिपत्राकात म्हटले आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या  कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.




याशिवाय अनुक्रमे 2016 आणि 2017 करिता विविध प्रवर्गा अंतर्गत जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे -



  • प्राचीन संस्कृत पंडित   - कै. श्री. वेंकटरमण दीक्षित शास्त्राी (मरणोत्तर) औदुंबर, सांगली
  • श्री. प्रमोदशास्त्राी कुलकर्णी, परभणी
  • वेदमूर्ती                      -   वेदचूडामणी दत्तात्रोय नवाथे (घनपाठी), पुणे
  • श्री. विश्वनाथ जोशी, आळंदी, पुणे
  • संस्कृत शिक्षक व इतर डाॅ.  शैलजा रानडे, यवतमाळ                            
  •                                      श्री. अरविंद गोसावी (कवठेकर), सांगली
  •       श्रीमती दुर्गा पारखी, नागपूर
  • श्री. माधव भुस्कुटे, निगडी, पुणे
  • संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक - डाॅ. सरोजा भाटे, पुणे
  •         डाॅ. विजया जोशी, नागपूर
  •         डाॅ. ललिता नामजोशी, मुंबई
  •        डाॅ. जयश्री साठे, पुणे
  • संस्कृत कार्यकर्ता        डाॅ. हंसश्री मराठे, नागपूर
  • श्री. माधव केळकर, पुणे
  • अन्य राज्यातील संस्कृत विद्वान - डाॅ. किशोर शर्मा, वाराणसी, उत्तर प्रदेश
  • श्री. गजानन भट्ट, उमचगि, यल्लपूर, उत्तर कन्न्ड, कर्नाटक