दिव्यांगाच्या स्पर्धेत वैनगंगा विद्यालयाचे सुयश



मनोज चिचघरे/भंडारा प्रतिनिधी

पवनी: जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून भंडारा येथे दिव्यांग विद्यार्थांसाठी जिल्हास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वैनगंगा विद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थी सहभागी होऊन धावण्याचा स्पर्धेत वर्ग 8चा विद्यार्थी सुखदेव नान्हे ह्याने प्रथम क्रमांक तर वर्ग 6वाचा विद्यार्थी गौतम बनकर हा गायन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला, विजयी स्पर्धकांना मुख्याध्यापिका उषा चउत्रे ह्यांनी शिल्ड व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले वैनगंगा शिक्षण संस्थेचेअध्यक्ष गणेश तर्वेकर सचिव विनोद मेंढे तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.