पाथरीत ऊसाच्या ट्रॉली खाली सापडल्याने तरुण ठार



परभणी/ प्रतिनिधी

पाथरी - सेलू रोडवर ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली आलेल्या एका तरुणाचे निधन झाले हि घटना शुक्रवार दि.२१डिसेंबर रोजी दुपारी २वाजता घडली. याबाबत ची माहिती याप्रमाणे पाथरी तालुक्यातील लिंबा येथील भागवत मंकाजी चव्हाण वय २६ वर्षे या तरूणाचा रेणुका शुगर इंडस्ट्रीत परिसरात  कारखान्यात ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२२ ए.डी. २०५४ ऊस घेऊन जात असताना सेलू रोडवरील साई भोजनालयासमोर  ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या पाठीमागील टायर खाली  तरुण आल्याने अपघात झाला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर थांबवून घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी तरुणाला खाजगी वाहनाद्वारे उपचारसाठी परभणीला घेऊन जात असतांना वाटेतच त्याचे  निधन झाले. पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करतांना
 रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी सेलूच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.रात्री वृत्त लिहीपर्यंत  या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.