स्वखर्चाने बांधणार बी बँक 


खबरबात प्रतिनिधी/-विष्णू तळपाडे अकोले
पुणे येथील बळीराजा सन्मान पुरस्कार आयोजित कार्यक्रमात राहिबाई पोपेरे यांना बळीराजा सन्मानाने गौरविण्यात आले त्यावेळी मा.चंद्रकांत दादा पाटील    कृषि मंत्री यांनी कोंभाळणे या ठिकाणी स्वखर्चाने बीज बँक बांधणार असल्याची घोषणा केली .
                           कृषीमंञी पाटील यांच्या हस्ते बळीराजा सन्मान स्विकारल्यावर गावरान-बी बियाणांचा वापर करून नागरिकांनी विषमुक्तआहार घेण्यासाठी आग्रही भूमिका घेतलेल्या बिजमाता राहिबाई पोपेरे यांनी सकारात्मक उत्तर दिले.आर्थिक परिस्थितीमुळे सीड बँकेची व्याप्ती वाढविण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले .यावेळी राहिबाईनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भाषणांनी सभागृहच दणाणून टाकले,त्यामुळे 'पाटील'भावुक झाले व त्यांनी व्यासपीठावरुन राहिबाई पोपेरे ना स्वखर्चाने बीज बँक बांधून देण्याची घोषणा केली.यावरच न थांबत स्वीय सहाय्यकांना बीज बँकेसाठी जागेची पाहणी सुरूकरण्यासाठी आदेश ही दिले .
    हा पुरस्कार स्विकारताना व्यासपिठावर बायफचे अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते यांना बायफचे राज्य संचालक V.B.द्यासा ,सुधिर वागळे,प्रदिप खोसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .