महात्मा गांधी चौक येथे निदर्शने व धरणे आंदोलन



प्रशांत गेडाम/सिदेंवाही:

सिदेंवाही येथिल नवनिर्मित सिंदेवाही नगरपंचायत येथील कर्मचारी व कामगार यांचे नगरपंचायत आस्थापनावर समावेशन करणे, दिनांक १/१/२०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू करणे, सफाई कर्मचारी यांचे ५०० लोकसंख्या मागे १ पद मंजूर करणे, इतर १७ मागण्या मंजूर करण्यात यावी असे महाराष्ट्र नगरपरिषद / नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समिती ने निर्णय घेतल्या प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या न्याय व मागण्या मान्य करण्यासाठी दिनांक १५ डिसेंबर, २०१८ ला नगरपंचायत कार्यालय समोर महात्मा गांधी चौक येथे निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी भारतीय नगरपरिषद व महानगरपालिका कर्मचारी महासंघ शाखा सिंदेवाही चे अध्यक्ष पुरुषोत्तम खोब्रागड, जिल्हा सदस्य गुरुदास ठाकरे, उपाध्यक्ष भिमराव खोब्रागडे, सचिव संजय वाकडे, सहसचिव गिता नागापूरे, सल्लागार भास्कर निकुरे व सर्व नगरपंचायत कर्मचारी व कामगार होते. कार्यक्रमाचे संचालन सुधिर ठाकरे, तर आभार प्रदर्शन गुरुदास ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास सर्व कर्मचारी व कामगार वृंद सहकार्य केले.