हर्षल काकडेचे कार्य प्रत्येक नगरसेवकासाठी प्रेरणादायी
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:ज्या समाजात आपला जन्म झाला त्याचे आपण ऋण फेडलेच पाहीजे . ज्या नागरीकांनी आपणाला समाजसेवा करण्याची संधी दिली त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य समजून त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे वाडी नगर परिषदच्या वार्ड क्रमांक ८ चे शिवसेनेचे नगरसेवक, युवासेना जिल्हाप्रमुख तथा बांधकाम सभापती हर्षल काकडे यांनी स्वखर्चातुन बोअरवेल करून चार वार्डाला तहान मुक्त करण्याचे मोठे पूण्य पदरात पाडून घेतले .
नगरपरिषदअंतर्गत येणाऱ्या बहुतांश वार्डात वेणा जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो परंतु जलाश्यातला पाणीसाठा कमी झाल्याने शहरात पाणीपुरवठा सहा सात दिवसाआड केला जात आहे .यातच येत्या डिसेंबर महिन्यापासून वाडीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे .येत्या उन्हाळ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा बंद करणार यासाठी नगरपरिषद प्रशासनाने भविष्यात उद्भवणारी भीषण पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने ३० नोव्हेंबर रोजी तातडीची सभा घेऊन पाणी टंचाईबाबत नगरसेवकाडून वार्डातील पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने उपाय व सूचना मागितल्या त्यात प्रामुख्याने वॉर्डातील विहिरी स्वच्छ करणे,नवीन पाणी पंम्प बसविणे,नवीन बोअर करणे आदींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
परंतु या सर्व उपाययोजना राबविण्यासाठी बराच कालावधी लागणार तसेच शासकीय मंजुरीकरिताही वेळ लागणार असल्याची बाब वॉर्ड क्रमांक ८ चे नगरसेवक बांधकाम सभापती हर्षल काकडे यांच्या लक्षात येताच स्वतः पुढाकार घेत त्यांनी त्यांच्या वार्डातील वैष्णवमाता नगर येथील खाली भूखंडावर स्वखर्चाने बोरवेल करण्याचा निर्धार करून वसाहतीतील आजुबाजूच्या परीसरात पाणी कुठे मिळेल याचा शोध घेण्यासाठी या क्षेत्रात निपुण असलेले खाजगी तज्ञाना पाचारण करून जागा निश्चित केली व प्रत्यक्ष हर्षल काकडे हे उपस्थित राहून बोअरच्या कामाला सुरुवात केली असता १०० फुटावर ५ इंच भरपूर पाणी लागल्याने सर्वत्र आनंदाची लहर पसरली.आपल्या वॉर्डासोबतच आपण शहरातील पाच वॉर्डाला प्रशासनाचे सहकार्य घेऊन पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण झाल्याने पाच वॉर्डातील पाणी टंचाई दूर करण्यात यश मिळाल्याने मानसिक समाधान लाभले .पाण्याचे वाडीत कुठलेही मोठे स्त्रोत नाही त्यातच पाण्याची पातळीही आटल्याने उन्हाळ्यात भिषण पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार या गोष्टीची सतत चिंता मनात बाळगुन हा उपक्रम केल्याचे हर्षल काकडे यांनी सांगीतले .
यावेळी माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष केचे, अभियंता नरेंद्र तिडके ,कपिल भलमे,किताबसिंग चौधरी,वसंतराव इखनकर,आनंद इंगोले,विजय मिश्रा,अखिल पोहनकर,रणजीत सोनसरे,संदीप विधले,संदीप उमरेडकर,पर्वत सिंग सोलंखी,अमित चौधरी,नन्हेंलाल गुप्ता,सचिन बोंबले,अजित पॉल,गोलू सांभारे,क्रांति सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. या स्त्युत्य उपक्रमामुळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक तसेच नगर परिषदचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी हर्षल काकडे यांचे अभिनंदन केले.तर स्थानिक शिवसैनिकांनी मिठाई वाटून कौतुकास्पद उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त करून जल्लोष साजरा केला.