वडेगाव येथील युवा शेतकऱ्यांनी केले रक्तदान

तुकडोजी महाराज स्मृती दिनानिमित्त


चंद्रपूर -  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 50 व्या स्मृती दिनानिमित्त गुरुदेव सेवा मंडळ वडेगाव ,जय बजरंग क्रीड़ा मंडळ व रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन चंद्रपुर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तसेच रक्तदान विषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
   चंदनखेडा जवळील 50 घरे असलेल्या वडेगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.रागेश्री काविटकर तर प्रमुख अतिथी म्हणून मंडवाकर सर,प्राची हिवरकर मैडम,वडेगाव चे सरपंच सुहासिनी खोब्रागड़े,वीना भुसारी उपसरपंच,पोलिस पाटिल जोत्सना मानगुळधे ,रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन चे सदस्य तसेच गुरुदेव भक्ताची व ग्रामवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सर्व प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर पाहुन्यांची भाषणे झाली.त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले की,तुकडोजी महाराजांचे कार्य व रक्तदान चे महत्त्व या विषयी विस्तृत माहिती दिली.
  या वेळी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या सदस्यांचा रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.या मधे एकूण 20 युवा शेतकऱ्यांनी रक्तदान करुण सामाजिक कार्यात हातभार लावला.
 अश्या प्रकारे कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शैलेश चौधरी,हनुमान दोड़के,निखिल थेरे,महेश नन्नावरे यांनी मोलाचे योगदान केले.कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते दिवाकर मानगूळधे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.विट्ठल नन्नावरे यांनी केले.