पारधी वाघरी बोलीभाषा बोलणाऱ्या समाजाची जनजागृती रैली !

उमरेड/प्रतिनिधी:
कर्नाटक , तेलंगणा , येथे यशस्वीपणे पारधी समाजात जनजागृती रैली करण्यात आली , पारधी समाज जनजागृती रैलीला मोठया प्रमाणात या दोन्ही राज्यात प्रतिसाद मिळालेला आहेत , आता रैली परतीच्या प्रवासावर आहे , आज महाराष्ट्रातील हिंगणघाट ते अदिलाबाद महामार्गावर पिंपरी गावात रैली पोहचली , या गावामध्ये शासकीय कोणत्याही योजना मिळत नसल्यामुळे येथिल बांधव दारिद्र्याचे जिवन जगत होते .


पिंपरी गावाजवळच कोल्ही गाव आहे , त्या गावांमध्ये आज ही पारधी समाजाला ईतर समाज जवळ घेत नाहीत , शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना या गावातील पारधी बांधवांना मिळत नाहीत , म्हणून येथिल पारधी समाज आज ही दारिद्र्याचे जिवन जगत आहेत .

पिंपरी हे गाव वर्धा जिल्ह्यातील  हिंगणघाट तालुक्यात येते , अदिलाबाद ते हिंगणघाट या महामार्गावर दहेगाव , पिंपरी , कोल्ही , इत्यादी पाच ते सात गावे आहेत त्यांमध्ये हजारोंच्या संख्येत पारधी बांधव आपले वास्तव्य करीत आहेत , पिंपरी गावाची अत्यंत दैयनीय अवस्था होती , या गावाला ईतर समाज व शासन जवळ करीत नव्हते त्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना मिळत नसल्यामुळे घरकुल , राशन कार्ड , मतदान कार्ड , जातीचे दाखले , आदी शासकीय कागदोपत्री मिळत नसल्यामुळे शासनाच्या अनेक योजना पासून पारधी बांधव वंचित राहायचे.

नागपूर येथिल बबन गोरामन यांच्या लक्षात पिंपरी गावचे पारधी बांधव आज ही पिंपरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पारधी बेडयात आपले उदरनिर्वाह शिकारी , वर कसेबसे  जिवन जगत असल्याचे समजले आणि ईतर समाज त्यांना जवळ घेत नव्हता , बबन गोरामन यांनी ताबडतोब रेणके आयोग यांना या गावात आणले , व पिंपरी ग्रामपंचायत मधील पारधी बेड्याचे  नामकरण मुक्तीनगर म्हणून रेणके आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नामकरण केले .

पिंपरी ग्रामपंचायत दरम्यान येणाऱ्या मुक्तीनगर या पारधी बेड्याला नवीन नावाने ओळख मिळाली ,
आज या गावांमध्ये शासकीय कागदोपत्री , व घरकुल अश्या अनेक योजना मिळत आहेत , मुक्तीनगर येथिल पारधी बांधव शिकारी , व शेती करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत , आज या पारधी बांधवांना एक नवी ओळख मिळालेली आहेत , येथिल सगळे चिमुकले शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आलेले आहेत , सगळे मुलं  शाळेत जातात , मा .बबन गोरामन यांच्या परिश्रमाने आज मुक्तीनगर येथिल जवळपास चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेल्या पारधी बांधवांना माणूस म्हणून जिवन जगण्याची संधी मिळालेली आहेत ,

आदीवासी विकास विभागातर्फे यांना प्रत्येक योजना मिळालेल्या आहेत , या योजनांचा खरोखरंच मुक्तीनगर ला लाभ मिळालेला आहेत , आता हरूहरू तहसील , पंचायत समिती कडून त्यांना योजना मिळू लागल्या आहेत , येथिल पारधी बांधवांना बबन गोरामन यांनी मुक्तीनगर ला दत्तक गाव म्हणून घेतले आहेत येथिल पारधी बांधवांना  माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून दिली आहेत .

पारधी समाज जनजागृती रैली आज मुक्तीनगर येथे पोहचली व  समस्त पारधी बांधवाना या रैली संबंधित मार्गदर्शन केले या रैलीचे उद्दीष्ट समजून सांगितले , व आपण सगळे पारधी बांधवांना एकतेचा संदेश दिला
या वेळी अनिल पवार , अतिश पवार , शिवसाजन राजपूत यांनी सुध्दा मार्गदर्शन केले .

           अनिल पवार 
 पारधी समाजसेवक नागपुर 
    मो .7888259211