शिवसेनेच्या महाआरतीला बळसाणे ग्रामस्थांची गर्दी



गणेश जैन/ धुळे, खबरबात
बळसाणे - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व महाराष्ट्र राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्या ला रवाना झालेत प्रभू श्रीराम मंदिरा चे बांधकाम लवकर सुरू व्हावे व मंदिराची पहिली विट रचण्याचे आमंत्रण शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना मिळाल्याने राज्यभर शिवसैनिकांमध्ये जल्लोष पूर्ण वातावरण तयार झाले आहे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसैनिक अयोध्या ला गेले आहेत.

शिवसेनेच्या वतीने श्रीराम मंदिरात महाआरती

हिंदू धर्मियांच्या अस्मितेचा आदर सन्मान व्हावा यासाठी दुसाणे सर्कल मधील बळसाणे येथील श्रीराम मंदिरात  (ता.२४) रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिरात श्रीराम प्रभू चरणी शिवसेने तर्फे महाआरती करण्यात आली*
   गावातील मुख्य चौकात उभारलेल्या श्रीराम मंदिरात शिवसैनिक व ग्रामस्थांमार्फत महाआरती करून *श्रीराम जय राम जय जय राम या नावाचा मोठ्या ने जयघोष करण्यात आला* याप्रसंगी श्रीराम मंदिरात बळसाणे ग्रामस्थ व शिवसेना पक्षाचे पदधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाआरती चे आयोजन साक्री तालुक्याचे *शिवसेना उपतालुका प्रमुख बळसाणे येथील महावीर जैन यांनी केले होते*