महानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला

◆९८ जागांकरिता ५४४८२ उमेदवार
◆सुमारे १४ शहरांत २० केंद्रांवर परीक्षा
◆परीक्षेसंबंधी माहिती महानिर्मिती संकेतस्थळावर
◆प्रवेशपत्र ई-मेलवर पाठविले
 नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मिती जाहिरात क्र.११(सप्टे)/२०१७ व अधिसूचना ८.८.२०१८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निम्नस्तर लिपिक या या पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने सदर पदांची ऑनलाईन परीक्षा निम्नस्तर लिपिक (लेखा) - १ डिसेंबर २०१८  व “निम्नस्तर लिपिक (मासं) -२ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येणार आहे.  परीक्षा केंद्र, ठिकाण, तारीख, वेळ इत्यादी तपशीलवार माहिती, महानिर्मितीच्या  www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

२०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उपस्थित(हजर) असलेले उमेदवारच केवळ ओंनलाईन परीक्षा देण्यास पात्र आहेत. मात्र, आरोपपत्र दाखल असलेला उमेदवार या परीक्षेसाठी अपात्र आहे.  एकूण ९८ जागांकरिता ५४४८२ उमेदवारांनी अर्ज केला असून राज्यभरातील १४ शहरांत २० केंद्रांवर हि परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर परीक्षा प्रवेशपत्र तसेच त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर एस.एम.एस. देखील पाठविण्यात आला आहे. प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास अथवा त्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास ०२२-४२०४००५३ /४२०४००५४  या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

महानिर्मितीची भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शकपणे केली जाते. उमेदवारांनी त्यांना कोणीही व्यक्ती, नोकरी मिळवून देतो असे आश्वासन देत असल्यास त्यांच्या भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये, कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आणून दिल्यास महानिर्मितीतर्फे तातडीने उचित कारवाई करण्यात येईल असे महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांनी कळविले आहे.