वेगळ्या विदर्भासाठी तृतीयपंथीचे आजपासून आंदोलन

किन्नर उत्तम बाबा सेनापती


नागपूर : भाजप सरकारने वेगळ्या विदर्भाच्या मुद्दावर निवडणूक जिकंली.त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मांगणी कडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने त्यांचे लक्ष वेधण्याकरीता
विदर्भ स्वराज्य आंदोलन समिती तर्फे आज १ डिसेंबर पासून आधी वेगळा विदर्भ दयावे नंतर निवडणूका घावे व निवडणूका पंर्यत विदर्भातील दारू व बिअरबारची दुकाने  बंद ठेवण्यात यावे, या मागणी करीता  शांतीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ स्वराज्य आंदोलन समितीचे किन्नर उत्तम बाबा सेनापती यांनी एका प्रशिध्दी पत्रकाद्वारे दिली.

उत्तम बाबा सेनापती यांनी  प्रशिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, साधारणतः सहा महिन्यात निवडणुका लागणार असून निवडणुकी पूर्वी विदर्भ वेगळा झाला पाहिजे. निवडणुकी दरम्यान राजकीय पुढारी मतदारांना दारु पाजून भुलवितात. आणि मतांचे पारडे स्वतःकडे झुकवितात. त्यामुळेच आम्ही विदर्भातील दारु बंदीसाठी आग्रही असल्याचे सांगत "आधी विदर्भ नंतर निवडणुका" अशी घोषणा देत आज १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विधान भवना समोरील विदर्भ ज्योत पज्वलीत करून वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला शांततेत सुरुवात करण्यात येईल.  दारु दुकाने बंद झाली तरच नागरिक ठिकाणावर राहतील. आणि विदर्भाचे महत्व त्यांना कळेल. विदर्भ आंदोलनाच्या भूलथापांशी आमचा संबंध नाही. विदर्भाचे आंदोलन चालवितांना हळूच त्यांना निवडणूक लढण्याची आवड निर्माण झाली आहे. याचा अर्थ त्यांना राजकारणात पडून भ्रष्टाचारात सहभागी व्हायचे असल्याचा आरोप करीत 'विरा' शी आमचा कोणताच संबध नसून या आंदोलनाला कोणतेही गालबोट लागणार नाही यांची काळजी घेत हे आंदोलन शांती व अंहिसेच्या मार्गाने करण्यात येईल. जर कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याची पूर्ण माहिती पोलिस प्रशासनास देण्यात येईल. असेही त्यांनी यांवेळी सांगितले.