धान उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट

पवनी(भंडारा):
यावर्षी शेतीची बिकट अवस्था झाली असून काही कोरडवाहू असलेल्या शेतकर्‍यांचे एका पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धानाचे नुकसान झाले अनेकांचे धान पानफोल झाल्यामुळे लोंबीत दाना भरला नसल्याने, मरळ झालेल्या धानाचे उत्पादन घटले असून कोरडवाहू शेतकर्‍यांची वाट लागली आहे,मागील दोन -तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे, पिकली तर शेती, नाही तर मातीं अशी अवस्था शेती व्यवसायाची आहे, दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत आहे, शिवाय धानाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कमी भावामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च भरुन निघत नाही अशी ओरड शेतकर्‍यांची आहे,उत्पादनाचा खर्च वाढत असल्यामुळे तसेच धानावर रोगराई येत असल्यामुळे औषधीचा खर्च अवाढव्य येत आहे, रोवणी पासुन तर मळनी पर्यंत शेतकर्‍यांना शेतमजूराना मजुरी द्यावी लागते, मजुराचे दरही गगनाला भिडले आहे, रासायनिक खतांचे भाव वाढले आहे, धानाचे उत्पादनही घटले आहे त्यामुळे भारी वाणाच्या धानाचे दर ३५००रुपये प्रति क्विंटल करण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शंकरराव तेलमासरे यांनी केली आहे,