नवमहाराष्ट्र विद्यालय येथे रंगला ऋणानुबंध सोहळा


गुरुजनांचा सन्मान करीत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा

सतीश डोंगरे/सातारा, खबरबात
           चितळी  (ता. खटाव जि.सातारा) येथील नवमहाराष्ट्र विद्यालयातील १९९६-९७ ची इयत्ता दहावीची एस एस सी बॅच असणारे विद्यार्थी विद्यर्थिनीनी एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित करून आपल्या माजी गुरुजनांचा सन्मान करून आपल्या शालेय जीवनास पुन्हा एकदा उजाळा दिला.
            प्रथम छ शिवाजी महाराज ,शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
                        यावेळी १९९७ रोजीच्या बॅच ला शिकवणारे त्यावेळचे शिक्षक व शिक्षिका यांनी हजेरी लावली .यामध्ये बाळकृष्ण पवार,माजी मुख्याध्यापक डी. आय. डांगे,सौ. डांगे मँडम,रघुनाथ चव्हाण,बाजीराव पाटिल,महादेव गरुड,हरिश्चंद्र पवार, विजय येवले, सुजाता येवले,सुदाम मुळीक , शंकर जगदाळे ,सौ. कांचन जगदाळे, अंकुश मोरे,व्ही. टी. ढाणे, एम. ए. पाटिल यासर्व माजी गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांकडून यथोचित शाल फेटा भेटवस्तू देऊन  सन्मान करण्यात आला.

          गेल्या दोन महिन्यापूर्वीपासून  या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी एक व्हाट्सअप्प ग्रुप बनवण्यात आला होता.या सोशल मीडियाच्या आधुनिक तेचा वापर करून देशाच्या न्हवे तर परदेशात असणाऱ्या आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींना शोधून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत संतोष पवार,प्रास्ताविक संपत पवार यांनी केले.कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरात कामानिमित्त पसरलेले विद्यार्थी तर एक विद्यार्थी खास अमेरिकेहून चितळीत दाखल झाला होता.
              यावेळी नवमहाराष्ट्र विद्यालयास या माजी विद्यार्थ्यांनी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ सिस्टीम भेट दिली.यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी सर्वांच्या समोर कथन केल्या.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ.विकास कदम यांनी तर उपस्थितांचे आभार अजित पवार यांनी मानले.