131 व्या भीम जयंतीचे औचित्य साधून विठाई तर्फे पाणपोई चे उद्घाटन
दिनचर्या न्युज:-
चंद्रपूर- उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. चंद्रपूरचे तापमान बघता सम्पूर्ण जगात आज सर्वाधिक तापमान असणारे तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून चंद्रपूरला ओळखले जाते . अश्या वातावरणात थंडगार पाणी उपलब्ध होणे खूप गरजेचे आहे .त्याकरिता दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा *विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पाणपोई* लावण्यात आली. मागील चार वर्षांपासून हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने सुरू आहे .कोरोना काळातही हा उपक्रम अविरत सुरू होता .या वर्षी सुद्धा याचं लाभ नागरिकांना मिळावा रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूची तृष्णा भागावी याकरिता जटपुरा गेट इथे दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती औचित्य साधून पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून लाभलेले संतोषजी थिपे (वनपरिक्षेत्र अधिकारी,बल्लारपूर) तसेच गिरीश चांडक जी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून वदंन करण्यात आले आणि त्यानंतर फीत कापून पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अपूर्ण करून वंदन
केले आणि मिठाई वाटून सर्वांचे तोंड गोड केले.नंतर विठाई संस्थेच्या वतीने उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी ज्ञानसूर्य, महामानव, युगपुरुष ,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. पुतळ्याला संस्थेतर्फे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळेस अध्यक्ष महेश काहिलकर,
ओमप्रकाश मिसार, संजीवनी कुबेर, विठाबाई काहिलकर,
दिनेश जुमडे, राजू काहिलकर, विनोद गोवारदीपे, चेतंन जनबंधु, कीर्ती नगराळे, भारती कश्यप, माधुरी काहिलकर, वैशाली बावणे, सुषमा मोकळे,तनू मोकळे, कल्पक नगराळे, मिथिलेश काहिलकर, मैथिली काहिलकर इत्यादी ची उपस्थित होती