जिल्ह्यात आतापर्यंत 3690 बाधित कोरोनातून झाले बरे
उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 2903
जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 6682 वर
24 तासात 373 नवीन बाधित; पाच बाधितांचा मृत्यू
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 373 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 6 हजार 682 वर गेली आहे. आतापर्यंत 3 हजार 690 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 2 हजार 903 बाधितांवर उपचार सुरू आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यू महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर येथील 46 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तिसरा मृत्यू क्राइस्ट हॉस्पिटल परिसर, चंद्रपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
चवथा मृत्यू टीचर कॉलनी परिसर, चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तर, पाचवा मृत्यू नवीन एसटी वर्कशॉप परिसर, तुकुम चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 89 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 82, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 239, कोरपना तालुक्यातील 18, गोंडपिपरी तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 23, जिवती तालुक्यातील 1, नागभीड तालुक्यातील 2, पोंभुर्णा तालुक्यातील 1, बल्लारपूर तालुक्यातील 23, ब्रह्मपुरी तालुक्यातील 4, भद्रावती तालुक्यातील 14, मूल तालुक्यातील 8, राजुरा तालुक्यातील 10, वरोरा तालुक्यातील 12, सिंदेवाही तालुक्यातील 1, सावली तालुक्यातील 10, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण 373 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्ड, रयतवारी कॉलनी, रामनगर, घुटकाळा वार्ड, ऊर्जानगर, संजय नगर, जलनगर वार्ड, बालाजी वार्ड, एसटी वर्कशॉप परिसर, बापट नगर, दवा बाजार परिसर, श्रीराम चौक, एकोरी वार्ड, सुमित्रा नगर, सिंधी कॉलनी परिसर, भटाळी, छोटा बाजार परिसर, भाना पेठ वार्ड, हरिराम नगर, गोकुल वार्ड, घुटकाळा वार्ड, नगीना बाग, बापट नगर वडगाव, समता चौक बाबुपेठ, द्वारका नगरी तुकुम, ज्योती नगर या परिसरातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
राजुरा तालुक्यातील विवेकानंद नगर, सास्ती कॉलनी परिसर, चुनाभट्टी वार्ड, दोहेवाडी, बामणवाडा परिसरातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील माढेळी, बोर्डा,रेल्वे कॉलनी परिसर, आशीर्वाद वार्ड, आझाद वार्ड, चौरशिया वार्ड, साई नगर, भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील झाडे प्लॉट परिसर, माजरी, गुरु नगर, पाटील नगर, शिवाजीनगर, सुमठाणा, गांधी चौक परिसरातून बाधित पुढे आले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विद्या नगर वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, आंबेडकर वार्ड, गणपती वार्ड, नांदगाव पोडे, बामणी, गांधी चौक परिसर, महाराणा प्रताप वार्ड, रेल्वे वार्ड, सरकार नगर, टिळक वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.चिमूर तालुक्यातील गुरुदेव वार्ड, मुरपार, शंकरपुर, भासुली, माणिक नगर वडाळा, बंदर कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे.
00000