अर्थव्यवस्थेमधील प्रदूषण दूर करा; खेड्यापाड्यातील ग्राहक जागा करा


जुन्नर /आनंद कांबळे जागरूक ग्राहक ही काळाची गरज आहे पर्यावरणाची चळवळ जेवढी राष्ट्रीय स्वरूपाची अत्यावश्यक चळवळ आहे तेवढीच ग्राहक चळवळ ही राष्ट्रीय स्वरूपाची अत्यावश्यक चळवळ आहे . अर्थव्यवस्थेमधील प्रदूषण दूर करावयाचे असेल तर खेड्यापाड्यातील ग्राहक जागा झाला पाहिजे असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी जुन्नर येथे व्यक्त केले .

अन्न नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक जागरण सप्ताहाचा शुभारंभ जुन्नर येथील जिजामाता सभागृह येथे गुरुवार दि,20।12।2018 रोजी संपन्न झाला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून औटी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जुन्नर तहसीलदार हणमंत कोळेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी विकास दांगट ,डॉ अशोक काळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर ,ग्राहक पंचायतीच्या जिल्हा महिला संघटक सौ,वैशाली आडसरे ,बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश गोडे प्रबोधनकार प्रा,पंकज गावडे ,पुरवठा निरीक्षक सुधीर वाघमारे ,रवींद्र तळपे ,संघटक सिताराम चव्हाण ,सचिव भाऊसाहेब वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते .


औटी पुढे म्हणाले जगातील उद्योग ग्राहकांच्या शोधात जगभर भीरत आहे अशावेळी सामान्य माणूस उपभोगवादाचा बळी न ठरता तो मानव कल्याणासाठी ग्रहाकवादासाठी उभा राहिला पाहिजे ,


तहसिलदार हणमंत कोळेकर म्हणाले की,ग्राहकाची दुर्बलता दूर करण्यासाठी ग्राहक वर्गाला जागरूक सुशिक्षित संघटित करून शोषण मुक्त कल्याणकारी अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान केले पाहिजे .


.यावेळी सामाजीक प्रबोधनाच्या कार्याबद्दल प्राध्यापक पंकज गावडे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .यावेळी ग्राहक पंचायतीच्या आरोग्य समितीचे प्रमुख डॉ, अशोक काळे ,बीडीओ विकास दांगट ,अशोक भोर यांनी मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन गोरक्ष लामखडे यांनी केले बाल विकास अधिकारी हरिभाऊ हाके यांनी आभार मानले